
संस्कृत महोत्सवांतर्गत निःशुल्क संस्कृत भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक अंतर्गत भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने निःशुल्क सात दिवसीय संस्कृत भाषा परिचय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत दररोज सायं. ४.४५ ते ५.३० या वेळेत पार पडणार आहे.यामध्ये, संस्कृत साहित्य परिचय, सुभाषित, संभाषण, संस्कृत कथा इत्यादी विषय शिकवले जाणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
हा अभ्यासक्रम भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, रत्नागिरी उपकेंद्र, अरिहंत मॉल, तिसरा मजला, बसस्टँड जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे तरी नोंदणीसाठी आणि अधिकच्या माहितीसाठी प्रा. अविनाश चव्हाण ( ९३७०६५८४९६) यांच्याशी संपर्क करावा. हा अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून, संस्कृतप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्यावतीने करण्यात आले आहे https://forms.gle/4pEt9dw2MFhWyWv26 नाव नोंदणी साठी या लिंकचा वापर करावा