
गणपतीपुळे समुदात बुडणार्या दोन जणांना जीवरक्षकांनी वाचवले
अंगारकी यात्रेच्या निमित्याने गणपती पुळे येथे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या सांगली येथील दोन जणांना बुडताना जीवरक्षकांनी व पोलीसानी वाचविली.
सांगली तासगाव येथील वैभव चव्हाण व संतोष चव्हाण हे दोघे समुद्रात आघाेळीसाठी उतरले त्यांना खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बुडू लागले यावेळी किनाऱ्यावर असलेले जीवरक्षक व पोलिसांच्या हि घटना निदर्शनास आली. जीवरक्षक रोहित चव्हाण अनिकेत चव्हाण,फोटोग्राफर निखिल सुर्वे आदींनी समुद्रात धाव घेऊन या दोघा तरुणांना बाहेर काढले व त्यांचा जीव वाचविला.
www.konkantoday.com