
हे म्हणजे एक प्रकारचे टार्गेट किलिंगच -खासदार संजय राऊत
किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याप्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याप्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.किरीट सोमय्या यांची आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप प्रसारित केल्याप्रकरणी लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.यावर संताप व्यक्त करत ‘हे म्हणजे एक प्रकारचे टार्गेट किलिंगच आहे’, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केला.
माध्यम प्रतिनिधींनी कमलेश सुतार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी एका महाराष्ट्र, मराठी द्वेष्ट्या व्यक्तीचा भांडाफोड केला, मुखवटा फाडला आणि सत्य समोर आणले. त्याची चौकशी करायची सोडून कमलेश सुतार यांच्यावर, त्यांच्या चॅनलवर आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. खरे म्हणजे हे नागडे, उघडे सत्य महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्वच पत्रकारांनी समोर आणले. युट्यूब चॅनलने समोर आणले. त्यावर वृत्तपत्रांनी बातम्याही दिल्या. पण गुन्हा दाखल होतो तो कमलेश सुतार, लोकशाही चॅनल आणि अनिल थत्ते यांच्यावर. हे एक प्रकारचे टार्गेट किलिंग आहे.’
‘महाराष्ट्रीतच नव्हे तर देशातील सर्व पत्रकार संघटांनी, ज्यांना नागरी स्वातंत्र्यांचा पुरस्कार करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी, प्रत्येक लढवय्या नागरिकाने याचा धिक्कार आणि निषेध केला पाहिजे आणि सरकारला जाब विचारायला पाहिजे.
www.konkantoday.com