रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे ९१६ हेक्टर्स मध्ये M.I.D.C उभी करण्याचा निर्णय शासन दरबारी सुरू आहे. पण या ठिकाणी MIDC होत असताना तेथील शेतकऱ्यांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांची घरे विस्थपित होणार नाहीत ह्याची दक्षता घेणं आवश्यक आहे.कोणत्याही परिस्थितीत रासायनिक कारखाने येऊ देणार नाही आणि शिवसेना पूर्ण त्या परिसरातील शेतकऱ्यांबरोबर आहे असे ठाम मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.या संदर्भात अधिक वृत्त असे की, वाटद खंडाळा या परिसरात नव्याने M.I.D.C उभी राहण्याबाबत जमीन संपादित करण्याबाबतच्या नोटिसा जमीन मालकांना(शेतकऱ्यांना ) बजवण्यात आल्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उदयोग मंत्री यांच्या बरोबर शेतकऱ्यांसमवेत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या वाटद खंडाळा M.I.D.C उभारताना तेथील शेतकऱ्यांच्या घरांना विस्थापित करण्याला माझा विरोध राहिल. रत्नागिरी जिल्ह्यात रासायनिक कारखान्यांना जनतेचा विरोध झाल्याचे यापूर्वी वेळोवेळी दिसून आले आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताच निर्णय करू नये असे देखील उदय सामंत यांनी संगितले .
वाटद M.I.D.C संदर्भात माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी १८ तारीख ला २.०० वाजता बैठकीचं आयोजन केले असल्याचे उदय सामंत यांनी संगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here