मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहर बॅनरनी सजले
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महा जनादेश यात्रा घेऊन रत्नागिरीत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागताची भाजपने जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री राजापूर येथून आडिवरे मार्गे रत्नागिरीत दाखल होणार असून जयस्तंभ येथे त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. मुख्यमंत्री यांचे येणाऱ्या मार्गावर व शहरातील भाटे जयस्तंभ पासून शिवाजी स्टेडियमच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.शहरातील होल्डिंग्स पासून डिव्हायडरमधील फलकांवरही स्वागताचे फलक झळकत आहेत.विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक आमदार प्रसाद लाड व नूतन जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत जोरदार करायचा चंग बांधल्याने मुख्यमंत्र्यांचे स्वागताचे फलक व भाजपाचे झेंडे यांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रत्नागिरी शहर भाजपमय केले आहे. एकीकडे भाजपने स्वागताचे फलक उभे केले असतानाच माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या स्वाभिमान पक्षानेही शहरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे फलक उभे केले आहेत.तर शिवसेनेनेही काही ठिकाणी शिवसेनेच्यावतीने तर काही ठिकाणी शिवसेना भाजप युतीच्यावतीने स्वागताचे फलक लावले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांची भव्य सभा शिवाजी स्टेडियम येथील बंदिस्त उभारण्यात आलेल्या मडंपात होणार आहे. याशिवाय दुचाकी रॅली व चारचाकी रॅली याद्वारे भाजप प्रथमच मोठे शक्तिप्रदर्शन करीत आहे.
www.konkantoday.com