मनसे उपजिल्हाध्यक्षासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

रत्नागिरी. : मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या माध्यमातून हे प्रवेश झाले. यामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी रामराम करत भाजपाची वाट धरली. आगामी नगरपालिका निवडणुका समोर ठेवून लवकरच भाजपमध्ये प्रवेशाचा धमाका होणार असल्याचे समजते.रूपेश सावंत यांच्यासमवेत शहरातील विविध भागांतील मनसे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

सारिका शर्मा, माधवी गुरव, स्मिता गावडे, मोहिनी झगडे, निलम जाधव, राजश्री सावंत, शीतल राणे, सोनाली केसरकर, विजयश्री बंडबे, सुशिल विलणकर, राजन सावंत, श्रावणी सावंत, श्रुती साळवी, मृदूला खामकर, देवांग खामकर, समीर सावंत, जितेंद्र जाधव, उत्तम राणे, सतीश राणे, मनाली राणे, ओंकार सिनकर, गजानन आहिर, शिल्पा कुंभार, राहुल सावंत, सिद्धेश धुळप, नेत्रा खराटे, राही सावंत, सिद्धी बोरकर, आराध्या मोरे, समिता बोरकर आदींनी भाजपात प्रवेश केला.

या वेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी सरचिटणीस सतेज नलावडे, उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे, डॉ. विनय नातू, प्रमोद जठार, महिला प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके डॉ. ऋषिकेश केळकर, ॲड. बाबासाहेब परुळेकर, विलास पाटणे, सचिन वहाळकर यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष, विधानसभा प्रमुख, तालुकाध्यक्ष, मोर्चा, प्रकोष्ठप्रमुख, शहराध्यक्ष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button