गणेश गुळ्याचे सरपंच संदीप शिंदे यांच्यावर कोयतीने वार करण्याचा प्रयत्न ,आरोपी ताब्यात

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे चे सरपंच संदीप शिंदे यांच्यावर कोयतीने वार करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.यातील आरोपी राकेश नागवेकर हल्ला करून नजीकच्या जंगलात पळून गेला त्याला रात्री उशिरा पोलिसांनी पकडले आहे.शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिंदे हे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावेळी तेथे आरोपी राकेश नागवेकर आला त्याने शिंदे यांच्या बरोबर वाद सुरू केला अचानक राकेशने कोयत्याने संदीप शिंदे यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला परंतु शिंदे यांनी वार चुकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या खांद्यावर वार बसला त्यामुळे ते जखमी झाले.आरोपी तेथून जंगलाच्या दिशेने फरारी झाला.आरोपी नागवेकर याच्यावर या आधी ही गुन्हे दाखल आहेत.आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.जखमी झालेल्या शिंदे यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button