
मुंबई पुणे एक्सप्रेस वर वऱ्हाड घेऊन जाणारी बस पेटली,42 प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच मोठा अनर्थ टळला
मुबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बसमधून लग्नाचे वऱ्हाड जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बस पेटल्यानंतर प्रवाशी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करत होते.
या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 42 प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच मोठा अनर्थ टळल्याचं म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ ही आगीची घटना घडली होती. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर बसने पेट घेतला होता. बस पेटल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
ही बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती, अशी माहिती मिळत आहे. या बसमधून लग्नाचे वऱ्हाड जात असल्याची माहिती मिळत आहे.
www.konkantoday.com