कोंकण रेल्वे प्रशासनाने कोकणातील जनतेच्या भावनांशी खेळू नये -सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत यांचा इशारा
कोकणातील लोकांच्या भावनांशी खेळणे आज पासून बंद करा अन्यथा रत्नागिरीमधून एकही गाड़ी ना मुंबई ला जाणार ना गोव्याला जाणार असा निर्वाणीचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत यांनी दिला आहे.त्यांनी कोकण रेल्वेच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
गणपती या सणासाठी तुम्ही ज्यादा गाड्या सोडल्यात म्हणून आम्ही कोकण रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन केले होतेच पण याच ज्यादा गाड्या तुम्ही अचानक रद्द केल्या तेही लोकांना पर्याय न देता.इतक्या पॅसेंजरचे हाल केलेत तेही रात्री, काल देखील हॉलिडे स्पेशल १०.५०ची ही गाड़ी रात्री २ वाजता सोडली गेली.गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जाहीर केलेली हॉलिडे स्पेशल गाडीही आयत्या वेळी रद्द करण्यात आली.यापुढे गणपती सणाला अशाप्रकारे लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न स्थानिक कोकणरेल्वे प्रशानाने करू नये अन्यथा गंभीर परिणामाला तोंड द्यावे लागेल.असा रत्नागिरीकरांच्या वतीने इशारा आहे.
कोकणरेल्वे प्रशानाने पुढच्यावर्षि गणपती आगमनाच्या आधीचा एक दिवस गणपतीचा दिवस , विसर्जनाचा दिवस व दुसरा दिवस ,आणि अनंतचतुर्थीचा दिवस या महत्वाच्या दिवसात कोकणात येणार्या व जाणार्या गाड्यांना कोकण रेल्वेने अग्रक्रमच दिला पाहिजे.त्यावेळी मध्यरेल्वेच्या गाड्यांना साईडला काढून ठेवा ही काळजी कोकणरेल्वे प्रशानाने घ्यावी कारण हे सिग्नल कोकणरेल्वेचे अधिकारात असतात. नाहीतर या दिवसात बाहेरून येणार्या जाणार्या गाड्या दरड कोसळल्यानंतर ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने वळवाव्यात पण यापुढे गणपतीच्या या कालावधीमधे कोकणची एकही गाड़ी रद्द अथवा उशीरा धावु नये याची काळजी कोकणरेल्वे प्रशानाने घ्यावी. पोलीस बळाचा वापर करून कोकणी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये.आपल्या कोकणातील अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून ते खासदांरापर्यंत आता आक्रमक व्हा अन्यथा काही दिवसांनी फक्त रेल्वे आमच्या कडून जाते असच सांगावे लागेल म्हणून लोकांच्या मतावर निवडून आलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील सर्व लोकप्रतिनिधीनी या विषयाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com