ग्रामसेवकांचा संप सुरूच,ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प
आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ग्रामसेवकांनी आपल्या ताब्यातील असलेले प्रशासकीय कामाचे दप्तर पंचायत समिती प्रशासनाकडे जमा केले आहेत. शासकीय कामकाजासाठी ग्रामपंचायतीकडून विविध प्रकारचे दाखले दिले जातात मात्र ग्रामसेवकांच्या संपामुळे हे काम ठप्प झाले आहे.यामुळे ग्रामीण भागातील जनतेची अनेक कामे रखडली आहेत.गेल्या बावीस दिवसांपासून ग्रामसेवक संपावर आहेत.
www.konkantoday.com