जिल्हा परिषदेच्या सीईओ अाचल गोयल यांचेवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ आचल गोयल या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत त्यामुळे जि.प सीईओंवर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत व जि.प अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ सदस्य उदय बने,शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, शिक्षण सभापती सहदेव बेटकर,सभापती प्रकाश रसाळ, भाजपचे दत्ता देसाई आदीजण उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा शिक्षक बदल्या प्रकरणात जि. प मधील सर्व पदाधिकाऱ्यांचा विरोध असताना देखील त्यांना डावलून जि.प सीईओंनी रातोरात बदल्या केल्या.जिल्हा परिषदेच्या सीईओ लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेत अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्याच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्याने रिक्त पदांची संख्या वाढणार आहे.त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शाळांवर होणार असून मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. या सर्व प्रकरणात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.यावेळी बोलताना ज्येष्ठ सदस्य उदय बने यांनी जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन चालवायचा असतो परंतु जिल्हा परिषदेच्या सीईओंनी लोकप्रतिनिधींना अनेक निर्णयात विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मागील जनरल सभेत सदस्यांनी अविश्वास ठराव आणण्याचा इशाराही दिला होता. परंतु त्यानंतरही सीईओंच्या वर्तवणुकीत फरक पडला नाही.त्यामुळे अविश्वास ठराव आणण्याची वेळ आली जि.प अध्यक्ष स्वरूपा साळवी यांनी देखील जि.पच्या सीईओ अध्यक्ष व पदाधिकार्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतात आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या करू नयेत असे सर्व लोक प्रतिनिधींची भूमिका असताना देखील तसे त्यांना लेखी कळवुनही जि.प सीईओनी शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यामुळेच या अविश्वास आणण्याच्या निर्णया पर्यंत सर्व पदाधिकारी व सदस्य आले असल्याचे त्यानी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button