क्रीडा स्पर्धांचे आयोजन मान्यताप्राप्त एकविध क्रीडा संघटनांनी 9 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे द्यावीत रत्नागिरी, दि. 6 (जिमाका) : क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी जिल्ह्यातील मान्यताप्राप्त एकविध क्रीडा संघटनांनी आवश्यक कागदपत्रे 9 ऑगस्टपर्यंत कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने समाविष्ट झालेल्या विना अनुदानित शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. या खेळ प्रकारांना ५% खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोख पारितोषिके या योजनांचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. सन २०२4-25 या शैक्षणिक वर्षात आयोजित करावयाचे खेळ प्रकार आष्टे डू आखाडा, युनिफाईट, मॉन्टेक्सबॉल क्रिकेट, स्पीडबॉल, तेंग सू डो, फील्ड आर्चरी, कुडो, मिनी गोल्फ, सुपर सेव्हन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, थाय बॉक्सिंग, फ्लोअरबॉल, हाफ किडो बॉक्सिंग, रोप स्किपींग, कुराश, टेबल सॉकर, हुप कॉन दो, ग्रॅपलिंग, जित कुने दो, कॉर्फबॉल, सिलंबम, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, युंग-मुं-दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, रस्सीखेच, वुडबॉल, लगोरी, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, फुटसाल, पॉवर लिफ्टींग, टेनिस बॉल क्रिकेट, चॉकबॉल, चॉयक्वोंदो, फुटबॉल टेनिस, बुडो मार्शल आर्ट, पेंट्याक्यु, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, म्युझीकल चेअर हे आहेत. या खेळांच्या एकविध जिल्हा संघटनांना क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे असल्यास धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असलेले संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र , संघटनेचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व ई मेल आयडी, अध्यक्ष व सचिव यांचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संलग्नता प्रमाणपत्र, पंच परीक्षा उत्तीर्ण असलेल्या पंचांची यादी, स्पर्धा आयोजन संघटना स्वत:च्या जबाबदारीवर तसेच संघटनेच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्याने करणार असल्याचे हमीपत्र ही कागदपत्रे दि. 9 ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावीत. तरच आपल्या संघटनेच्या खेळांच्या जिल्हास्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button