
महाराष्ट्र बँकेच्या पावस बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी बी. आर. साबळे यांचे विरोधात ५२ लाखाच्या फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल
रत्नागिरी:बँक ऑफ महाराष्ट्रचे पावस शाखेच्या बँकेचे शाखाधिकारी बी. आर. साबळे यांच्या विरोधात मुद्रा लोन अंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करून त्यामध्ये बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल चिंतामणी जोशी, रा. पुणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यातील बी. आर. साबळे हे बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी म्हणून पावस येथे काम करीत असताना त्यांनी मुद्रा लोनच्या अंतर्गत आरोपी क्र. २ ते १४ यांच्याशी संगनमत करून त्यांची कोटेशन मंजुर करून त्यांच्या ५२ लाख २५ हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणाला मंजुरी दिली. त्यानंतर संबंधित लोकांच्या खात्यात रकमा वर्ग करून बँकेची फसवणूक केली. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बँकेचा विश्वासघात करून बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोट्या कागदपत्राच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करून आर्थिक अपहार केला. त्यानंतर या प्रकरणाची बँकेकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. व कार्यालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी अतुल जोशी यांनी याबाबत पूर्णगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com