नगर परिषदेचा निषेध करण्यासाठी काळ्या छत्र्या उघडून नागरिकांनी छेडले आगळे आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्यां कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यापासून शहरातील अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.असे असूनही नगर परिषद प्रशासन ढिम्म आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावरून जागृत झालेल्या रत्नागिरीकरांनी थेट नगर परिषदेवर धडक मारली निषेध करण्यासाठी शहरातील नागरिक नगरपरिषदेमध्ये एकत्र आले.त्यांनी काळ्या छत्र्या उघडून शांततापूर्ण पद्धतीने निषेध व्यक्त केला. एखाद्या सामाजिक प्रश्नांसाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून रत्नागिरीकर एकत्र आल्याने आता रत्नागिरीकर जागृत झाल्याचे चित्र दिसत होते.सामाजिक कार्यकर्ते राजू किर, बंटी वणजू,कौस्तुभ सावंत,केशव भट, उदय लोध,नंदकुमार साळवी,कर्मचारी नेते सुधाकर सावंत,मुकुंद जोशी,राकेश चव्हाण, शुभदा देव,राधिका मलुष्टे,अजय गांधी, विलणकर,अभिजित हेगशेटये,दिगंबर मगदूम,अॅड.अमोल शिंदे आधी अनेक जण उपस्थित होते. नागरिकांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते परंतू मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यानी निवेदन स्वीकारले.रत्नागिरी नगर परिषद नागरिकांकडून कर वसूल करीत आहेत. त्यामुळे चांगले रस्ते मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे त्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे. असे असूनही शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. गणपती सणापूर्वी खड्डे बुजवणार व रस्ते चांगले केले जातील असे आश्वासन नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी देऊनही दिवसेंदिवस रस्त्यावरील खड्डय़ांच्या संख्येत वाढ होत आहे. रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.प्रत्यक्षात हे खड्डे आहेत तसेच राहिल्याने गणपती बाप्पाचे विसर्जनही करण्यासाठी खड्डेमय रस्त्यातूनच मोठी कसरत करत नागरिकांना जावे लागला.या सर्वाला रत्नागिरी नगर परिषद प्रशासन व सत्ताधिकारी जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.यामुळे नागरिकांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती.
नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी निवेदन स्वीकारले व आठ दिवसात खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले.आता रत्नागिरी नगर परिषद खड्डे बुजवण्यासाठी नेमकी कोणती भूमिका व उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यानंतर नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
www.konkantoday.com