
चंद्रयान मोहीम-विक्रम लँडरचा संपर्क तुटला.धीर सोडू नका-नरेंद्र मोदी
चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघा एक मिनिटं बाकी असताना भारताच्या चंद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटला. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी यासंदर्भात औपचारिक घोषणा करत विक्रम लँडरशी संपर्क तुटला असून डेटा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती दिली. ‘चंद्रयान २’ मोहिमेचा महत्वाचा टप्पा असणाऱ्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने इस्रोचे सर्वच शास्त्रज्ञ निराश झाल्याचे दिसून आले.त्यावेळी तेथे उपस्थित असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांची पाठ थोपाटली आहे. ‘हिंम्मत ठेवा, निराश होऊ नका, तुमचा देशाला अभिमान आहे, असे ते म्हणालें गेली तीन वर्षे शास्त्रज्ञांनी चांद्रयानवर खडतर मेहनत घेतली आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. सर्व शास्त्रज्ञांनी विज्ञानाची आणि देशाची मोठी सेवा केली आहे. तूम्ही धीर सोडू नका, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञाचे मनोधोर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितले की प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. संपर्क तुटल्यानंतर तुम्ही निराश झालेलं मी पाहिलं. निराश होऊ नका, तुम्ही केलेले काम छोटे नाही.हिम्मत गमावू नका. इस्त्रो प्रमुखांनी पुन्हा संपर्क होऊ शकतो असे सांगितले आहे.मी आणि संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे. तुमच्या मेहनतीनेच पुन्हा एकदा देशाची मान उंचावेल. पुढील कामगिरीसाठी तुम्हाला शुभेच्छा.