
रत्नागिरी जिल्ह्यात अद्यापही ९१ हजार ३०४ ग्राहकांकडे वीज थकबाकी
वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधींची थकबाकी असल्याने महावितरणपुढे वसुली करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ५१२ ग्राहकांकडे १८ मार्चपर्यंत ५२ कोटी ५४ लाख ९९ हजार रुपयांची थकबाकी होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ४१ हजार २०८ ग्राहकांनी १४ कोटी ९४ कोटी रुपयांचा भरणा केला असला तरी अद्याप ९१ हजार ३०४ ग्राहकांकडे ३७ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी अद्याप शिल्लक आहे.
www.konkantoday.com