
रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत टेस्टिंग किटचा तुटवडा?
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढतआहे शासकीय रुग्णालयातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत टेस्टिंग किटचा तुटवड भासू लागल्याची माहिती मिळत असून आहे. सध्याच्या परीस्थितित एक ते दोन दिवस पुरतील एवढीच किट शिल्लक असल्याचे कळते
नवीन टेस्टिंग किट खरेदी करण्याची प्रक्रिया टेंडर प्रक्रियामध्ये अडकल्याची माहिती पुढे आली आहे. जर टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, तर दुसरी कडुन ही कीट मागवावी लागण्याचे शक्यता आहे.
९ जून रोजी रत्नागिरीतील कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
सध्या रोज सुमारे ३०० तपासण्या या प्रयोशाळेत होत आहेत. आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या व तपासण्या वाढल्याने या किटची कमतरता जाणवू लागली असून प्रशासन यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
www.konkantoday.com