
शिक्षक दिनीच शिक्षण खात्यातील अधिकार्याला लाच घेताना पडकले
रायगड:शिक्षक दिनाच्या पवित्र दिवशी रायगड येथील शिक्षण खात्यातील जि.प. शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकार्याला लाचलुचपत खात्याने लाच घेताना पकडले आहे. सदरच्या अधिकार्याने आंतरजिल्हा बदली करण्यासाठी १ लाखाची लाच मागितली होती. याबाबत लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल झाल्यावर रायगड लाचलुचपत विभागाने कारवाई करत अधिकार्याला जाळ्यात पकडले.
www.konkantoday.com