
कुडाळ येथे मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाचे भूमिपूजन
कुडाळ: मालवणी भाषा व दशावतारी कला सातासमुद्रापार नेवून मालवणी भाषेला लोकप्रियता मिळवून देणारे नाट्यकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या नावाने कुडाळ येथे सुसज्ज नाट्यगृह होत असून त्याचा भूमिपूजन समारंभ सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हे नाट्यगृहाचे स्वप्न साकार होत असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व अन्य मान्यवर उपस्थित होते.