रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला सहकार भूषण पुरस्कार
रत्नागिरी: सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सन्मानात आणखी एक तुरा खोचला गेला आहे. बँकेला नुकताच सहकार भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ताराजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने अनेक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून राज्यात अनेक सहकारी बँका नुकसानीत असताना रत्नागिरी जिल्हा बँकेने सातत्याने चांगली कामगिरी करून बँकेला नावारूपाला आणले आहे. बँकेने सहकारी क्षेत्रात कामगिरी बजावताना सतत अ वर्ग राखला आहे. या वर्षी बँकेने २० कोटींचा नफा मिळवला आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील विविध सोसायट्यांना मदतीचा हातभार लावला आहे. त्यामुळे या पुरस्कारामुळे बँकेचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. याआधी शासनाकडून बँकेला सहकारनिष्ठ हा पुरस्कारही प्राप्त झाला होता.
www.konkantoday.com