
समुद्र खवळल्याने रायगड मुंबई येथील दीडशे नौका जयगड बंदरात
गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून समुद्रही मोठ्या प्रमाणावर खवळलेला आहे. मच्छीमारी बंदी उठल्याने समुद्रात मच्छीमारीसाठी उतरलेल्या मुंबई येथील व रायगड येथील दीडशे मच्छीमारी नौकांना वादळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले यामुळे सुरक्षिततेच्या कारणासाठी या नौकांनी जयगड बंदरात आश्रय घेतला आहे.वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्याने मच्छीमारी ठप्प झाले आहे.धोका पत्करून उतरलेल्या मच्छीमारांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.खोल समुद्रात वादळामुळे टाकलेले जाळे एकमेकांना चिकटून राहत असल्याने मच्छीमारांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे.अजूनही दोन तीन दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com