
भारतीय वायुदलाने केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून,ऑपरेशन सिंदूर नाव का?
पहलगाममध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी त्यांनी कोणत्याही महिलेला लक्ष्य केलं नव्हतं. हेच मुख्य कारण आहे की भारताच्या या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आले.
महिलांसमोर त्यांच्या पतीला, त्यांच्या जवळच्या लोकांना मारण्यात आलं. त्यामुळे देशातील महिलांच्या सौभाग्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने त्याचे प्रत्युत्तरही त्या सौभाग्याच्या प्रतीकाच्या माध्यमातून दिलं जावं, हा ‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागील विचार आहे.दरम्यान, भारतीय वायुदलाने केलेली ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून केली आहे. या कारवाईत कोणत्याही सामान्य नागरिकाला हानी पोहचवण्यात आलेली नाही.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून स्पष सांगण्यात आले आहे की ही मोहित फक्त दहशवादाविरोधात आहे. पण या कारवाईनंतर आता पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे चर्चा आहे.
भारताची गेल्या काही वर्षातील २०१६ सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ बालाकोट एअरस्ट्राईकनंतरची ही तिसरी मोठी कारवाई आहे.