बांद्यामध्ये चष्म्याचा कारखाना उघडणार, ५०० जणांना रोजगार मिळणार

0
349

रत्नागिरी:येत्या पंधरा दिवसात सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने बांदा येथे चष्म्याचा कारखाना सुरू करण्यात येणार असून त्या माध्यमातून ५०० हून अधिक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होईल असे मत खा. विनायक राऊत यांनी बांदा येथे बोलताना व्यक्त केले. बांदा येथे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत आले होते. यावेळी पुरग्र्रस्तांना ५ हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. यावेळी बोलताना खा. राऊत म्हणाले आता विधानसभा निवडणुका येत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर फिरणार्‍या हौशा, नौशा, गौशापासून लांब रहावे व तुमच्या पाठिशी कोण उभे राहतात याचा अभ्यास करावा.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here