राणेंच्या भाजप प्रवेशाला पुन्हा एकदा खोडा

रत्नागिरी: स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे हे १ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये अभियाना अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. राणे यांच्या प्रवेशाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही हिरवा कंदिल मिळाला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की हा आमचा पक्षाचा निर्णय असल्याने राणे यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास कोणतीही अडचण असणार नाही.परंतु असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा गुगली टाकली आहे. राणे यांच्या भाजपा प्रवेशाबद्दलचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही शिवसेनेला विश्‍वासात घेवू. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय घाईघाईने निर्णय घेणार नाही असे एका वृत्तवाहिनीला सांगितल्याने राणे यांचा भाजप प्रवेशात परत एकदा खोडा निर्माण झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button