गावाकडे येणाऱया चाकरमान्यांची कार अचानक पेटली ,सुदैवाने प्रवासी बचावले
गणपती उत्सवासाठी मुंबईहुन गावी येणाऱ्या प्रवाशांची कार जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास राजापूर तालुक्यातील नाटे येथे सागरी महामार्गावर घटली. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही. मात्र सामानासहित स्विफ्ट डिझायर गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे.मिळालेल्या माहिती नुसार चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे गाडीतील सर्व लोक तात्काळ बाहेर पडले. नाटे गावच्या जवळच घटना घटल्याने माहिती मिळताच अनेकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस स्टेशनही जवळच असल्याने पोलीसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही धाडशी तरुणांनी गाडीतील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र किरकोळ सामान हाती लागले.बाकी किमती सामानासह गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. साखरी नाटे येथील अनेक मुस्लिम युवकांनी गाडी विझविण्यासाठी प्रयत्न केले.गाडीतील प्रवासी मुंबई वरून गावी गणपती साठी येत असल्याची माहिती मिळाली आहे. गाडीने भर रस्त्यातच पेट घेतल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र आग विझल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडी बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
www.konkantoday.com