
आता ते मौलाना कुठे आहेत जे काँग्रेसला, उद्धव ठाकरे साहेबांना मदत करा असं म्हणत होते?-माजी खासदार इम्तियाज जलील _
विशाळगडावर हिंसक घटना सुरु आहे. मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आली. आता ते मौलाना कुठे आहेत जे काँग्रेसला, उद्धव ठाकरे साहेबांना मदत करा असं म्हणत होते?असा सवाल करत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विशाळगड हिंसाचार प्रकरणी खडे बोल सुनावले.शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करत असताना आता कोणं हिंसा करतंय? असा म्हणत, आम्ही तुमचा आदर करतो मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता हे दुर्दैवी असल्याचे जलील म्हणाले.विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ झाल्याची घटना घडली. या घटनांचे काही व्हिडिओही समोर आले असून विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेवर इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे.आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेलात. आणि आता मुस्लिम समाजाची अशी परतफेड करत आहात असे जलील म्हणाले. मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आला. कोण हिंसा करतंय?शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करतात. असे म्हणत त्यांनी खडे बोल सुनावले. आम्ही तुमचा आदर करतो मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता दुर्दैवी आहे, जे पुस्तक महाराज तुम्ही मला दिले ते तुम्ही आता वाचा, आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेले, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.