
लांजातील नूतन बसस्थानकाच्या इमारतींचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते भूमिपूजन
लांजा येथे आता अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार असून त्याचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केला त्यांच्या हस्ते लांजा येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या बसस्थानकाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला यावेळी आमदार राजन साळवी,आमदार हुस्नबानू खलिफे, जी.प अध्यक्ष स्वरूपा साळवी, लांज्याचे नगराध्यक्ष सुनील कुरुप आदी मान्यवर उपस्थित होते.नव्याने उभारण्यात येणार्या बसस्थानकांमध्ये आठ फलाट,उपहारगृह, चालक वाहकांच्या साठी विश्रांतीगृह, महिलांसाठी विश्रांतीगृह आधी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com




