साळवीस्टॉप ते मिरकरवाडा मुख्य रस्ता काँक्रिटचा होणार ,४९कोटींचा प्रस्ताव
साळवीस्टॉप ते मिरकरवाडा या मुख्य रस्त्यावर वारंवार होणाऱ्या खड्ड्यांमुळे दुरावस्थेमुळे रत्नागिरी नगर परिषद हैराण झाली असून आता हा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनवण्याचा रत्नागिरी नगर परिषदेचा विचार आहे. यासाठी साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज या काँक्रिटीकरणासाठी ४९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला आहे.शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली आहे. मुख्य रस्ता काँक्रीटचा झाला तर सध्याची जी खड्ड्यांची समस्या भेडसावत आहे ती पुढे येणार नाही अशी नगर परिषदेला खात्री वाटत आहे. तसेच काँक्रिटीकरणावर जास्त पैसे खर्च झाले तरी ती उपाययोजना कायमची होऊ शकेल असे नगर परिषदेची भूमिका आहे. यासाठी लागणारा निधी कुणाकडून उपलब्ध होणार हे मात्र अद्याप कळलेले नाही.
www.konkantoday.com