अखेर चिपळूण पिंपळी येथे आठवड्यातून तीन दिवस कॅम्प होणार
चिपळूण येथील पिंपळी येथे बांधण्यात आलेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅक वरच कॅम्प घ्यावा या मागणीसाठी ठाम असलेल्या रिक्षा चालक मालक मालवाहतूक संघर्ष समितीने विश्रामगृहा समोर जोरदार निदर्शने केली.काल परिवहन विभागाने विश्रामगृहावर कॅम्प घेतला यामुळे संघर्ष समितीने जोरदार निदर्शने केल्यावर गुरुवारपासून आठवड्यातील तीन दिवस पिंपरी येथे ब्रेक टेस्टिंग ट्रॅकवर कॅम घेतला जाईल असे परिवहन खात्याने जाहीर केले आहे.पिंपरी येथेच कॅम्प घ्यावा या मागणीसाठी गेले काही दिवस रिक्षा चालक मालक वाहतूक संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने चालू आहेत. पिंपरी येथील ट्रॅकवर कॅम्प न घेतल्यास हा ट्रॅक उखडून टाकू व कोणत्याही शासकीय विश्रामगृहावर कॅम्प होऊ देणार नाही असा त्यांनी इशारा दिला होता परिवहन खात्याने परत विश्रामगृहावर कॅम्प लावल्यामुळे संघर्ष समितीच्या नेत्यांनी व सदस्यांनी विश्रामगृहावर धडक मारली यावेळी पोलिसांनी मध्यस्ती केली.शेवटी परिवहन अधिकाऱ्यांनी येत्या गुरुवारपासून आठवड्यातील तीन दिवस कॅम्प पिंपरी येथे होणार असल्याचे लेखी स्वरूपात लिहून दिले त्यामुळे अनेक दिवसांचा हा प्रश्न आता मार्गी लागला आहे.
www.konkantoday.com