बंदुकीच्या  गोळ्या मारून जगातून हद्दपार करा-मनसे नेते जितेंद्र चव्हाण यांच्या मागणीने खळबळ

लोकशाही मार्गाने लोकांचे प्रश्न हाताळत असताना देखील सत्ताधार्‍यांची हुकुमशाही व प्रशासनाकडून मिळणाऱ्या कायदेशीर कारवाईच्या धमक्यांमुळे आपली सहनशीलता संपत चालली आहे. लोकशाहीचा गळा घोटाळ्यापेक्षा मला पोलिसांकरवी बंदुकीच्या गोळ्या घालून रत्नागिरी जिल्ह्यातूनच नव्हे तर या जगातून हद्दपार करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी केली आहे. काल तशा आशयाचे फलक घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. लोकांच्या अनेक प्रश्नांबाबत आपण आवाज उठवत असतो सध्या जयगड डिंगणी रेल्वे प्रकल्पांबाबत देऊड चिंचवड येथील ग्रामस्थांच्या समस्यांबाबत जिल्हा प्रशासनाला एक महिन्यापूर्वी निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. मात्र त्यासाठी आवाज उठवण्यासाठी आंदोलन केल्यास सत्ताधार्‍यांचे एैकून प्रशासनाकडून कारवाईच्या धमक्या मिळत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी काहीच करू शकत नाही अशा जगण्याला कोणताही अर्थ नाही यामुळेच आपणाला रत्नागिरी जिल्ह्यातूनच नव्हे तर जगातून हद्दपार करावे अशी मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button