आता गणेशोत्सवानंतर चिपळुणातील बांधकामे हटविणार ,तहसिलदारांच्या बैठकीत निर्णय
चौपदरीकरणासाठी चिपळूणमधील बांधकामे आता गणेशोत्सवानंतर पाडण्यात येणार आहेत या संदर्भात नागरिकांचे शिष्टमंडळ व अधिकारी यांची बैठक तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत नागरिकांनी कारवाईवर आक्षेप घेऊन पाण्याची विजेची पर्यायी व्यवस्था होत नाही आणि पावसाळा संपत नाही तो पर्यंत कामाला सुरुवात करू नये अशी मागणी केली.त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे ठरवण्यात आले आहे. पुढील आठवड्यात संबंधित खात्याचे अधिकारी ठेकेदार व नगर परिषद यांची संयुक्त बैठक घेऊन शहरातील पाच ठिकाणी महामार्गाचा आराखडा प्रसिद्ध केला जाणार असून मोबदला न मिळाल्याने बांधकाम पाडायचे नाही असे ठरवण्यात आले आहे.
www.konkantoday.com