
वेळ पडल्यास रक्त देऊ पण वाशिष्ठीच्या पाण्याचा एकही थेंब देणार नाही -शौकत मुकादम
वाशिष्ठी नदीचे पाणी अन्य ठिकाणी वळवल्यास चिपळूण तालुक्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होईल यामुळे एकवेळ रक्त लागले तर देऊ पण वाशिष्टी नदीच्या पाण्याचा एकही थेंब देणार नाही असा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी सरकारला दिला आहे.
कोयनेच्या अवजलाचे पाणी मराठवाड्याला वळवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुकादम यांनी हा इशारा दिला आहे. वाशिष्टी नदीच्या पाण्यावर खेर्डी व लोटे एमआयडीसी अवलंबून आहे. याशिवाय वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर दहा हजार बोअरवेल दोन हजार विहिरी व दोनशेपेक्षा अधिक नळपाणी योजना आहेत. वशिष्ठीचे हे पाणी अन्य ठिकाणी वळवल्यास चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण होईल असे मुकादम यांचे म्हणणे आहे.माजी मुख्यमंत्री कै.बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना वशिष्ठी नदीचे पाणी अन्य भागात नेऊ दिले जाणार नाही असा मंत्रिमंडळाचा ठराव झाला आहे.
कोकणातील लोकांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.वाशिष्ठीचे पाणी बाहेर जाता कामा नये यासाठी आपण खासदार, आमदार व सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com