
राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्याची संधी – उद्योगमंत्री सुभाष देसाईं
कोरोनाचं संकट आल्यानं परराज्यातून आलेले बरेचसे मजूर त्यांच्या गावी परत गेले आहेत. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवण्याची संधी आहे, असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी व्यक्त केलं. स्थलांतरित मजूर गेले असल्यास त्यांच्या जागी स्थानिक भूमिपुत्रांना नेमा; असं आवाहन सुभाष देसाईंनी कंपन्यांना केलं.कोरोना संकटाचा संधी म्हणून वापर करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. चीनमधून येणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी योजना आखल्या जात आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ‘पुनश्च भरारी – आव्हाने आणि संधी’ अंतर्गत झालेल्या विशेष वेबिनार मालिकेत सुभाष देसाई मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते.
www.konkantoday.com