शिवसेना प्रवेश हीअफवा -आमदार भास्कर जाधव यांचा खुलासा
शिवसेनेत किंवा अन्य पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये असा खुलासा गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी केला आहे.रविवारी दुपारनंतर आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली त्यामुळे राष्ट्रवादीला भास्कर जाधव रामराम करणार अशी चर्चा व बातम्या दिवसभर विविध वाहिन्यांवर सुरू होत्या मात्र जाधव यांनी या केवळ अफवा आहेत आपण कुठेही गेलो नाही दिवसभर आपण मुंबईत विश्रांती घेत होतो या उलट आपण काल एका लग्नाची दुसरी गोष्ट हे नाटक पाहिले तर आज कागर हा मराठी चित्रपट पाहिला यामुळे आपल्याबाबत येणाऱ्या बातम्या या केवळ अफवा आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com