रत्नागिरीत दुकानदारांची ८२हजाराची फसवणूक
रत्नागिरीतील समर्थ डिजिटल या दुकानात दोन टीव्ही खरेदी करून त्याची रक्कम ऑनलाइनने जमा केली आहे असे चुकीचे दाखवून ८२हजारांची फसवणूक केली म्हणून दिनेश कुकरेजा नामक व्यक्तीविरुद्ध पोलीस स्थानक तक्रार नोंदवण्यात आली आहे.समर्थ डिजिटल या दुकानात दिनेश कुकरेजा नामक व्यक्ती आली त्याने पॅनासोनिक कंपनीचे दोन स्मार्ट टीव्ही खरेदी केले या दोन टीव्हीची किंमत ८२हजार रुपये होत होती ती त्याने ऑनलाइन आपल्या मोबाईलवरून दुकानदाराच्या खात्यात जमा केल्याचे दुकानदाराला दाखवले.सदरचा इसम टीव्ही घेऊन गेल्यानंतर प्रत्यक्षात रक्कम दुकानदाराच्या खात्यात जमा झालेली नसल्याने पोलिसांकडे कुकरेजा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com