साहिल दाभोळकर यांची १९ वर्षाखालील संघात निवड
चिपळूण:चिपळूण येथील साहिल दाभोळकर याची मुंबई १९ वर्षाखालील संघात निवड झाली आहे. साहिल हा खेर्डी येथील प्रतिथयश डॉ. संतोष दाभोळकर यांचा सुपुत्र आहे. साहिलला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याने स्थानिक पातळीवर अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. साहिलची निवड झाल्याचे पत्र बीसीसीआयने त्याला पाठविले आहे. चिपळूणमधून अनेक नामवंत क्रिकेटपटू तयार झाले होते. त्यामध्ये माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडीत, गुलाम परकार, झुल्फीकार परकार, शहाबुद्दीन गोटे, मनोज कोळवणकर आदींनी राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले होते. आता साहिलच्या रूपाने आणखी नवा क्रिकेटपट्टू राष्ट्रीय पातळीवर नाव कमवणार आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com