मासळी प्रक्र्रिया करणार्या कारखान्यांनी जीएसटी करामुळे खरेदी बंद केल्याने मच्छिमार अडचणीत
रत्नागिरी: मासळी प्रक्रिया करणार्या कंपन्यांना जीएसटी कर प्रणालीचा फटका बसल्याने त्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी मासळी प्रक्रिया करण्याकरिता लागणारी मासळी खरेदी करण्याचे बंद केल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अनेक मच्छिमारांवर त्याचा परिणाम झाला आहे. हे प्रक्रिया करणारे उद्योग मच्छिमारांकडू मासळी खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करून अनेक उत्पादने करीत होती. मात्र शासनाने आता त्यांच्यावर जीएसटी कर लावल्याने हे प्रक्रिया उद्योग अडचणीत आले आहेत. ते मासळी खरेदी करत नसल्याने मच्छिबंदीनंतर नव्या हंगामात मिळालेले लाखो रुपये किंमतीची मासळी किनार्यावरच टाकून द्यावी लागत आहे अथवा कवडीमोल दराने विकावी लागत असल्याने मच्छिमारही आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
www.konkantoday.com