शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या धान्याचा दर्जा घसरला
जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आहार मिळावा यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे.या योजने अंतर्गत पुरवण्यात येणारे धान्य चांगले तर राहोच परंतु ते नित्कृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी येत आहेत.हे धान्य पुरवण्यासाठी विविध ठेकेदारांनी ठेके घेतले असून त्यांच्या मार्फत हे धान्य शाळांना पुरविले जाते.आता या बद्दल तक्रारी आल्याने जिल्हा परिषदेने या प्रकरणात लक्ष घातले असून लवकरच ठेकेदारांना बोलून याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतले जाणार आहे.
www.konkantoday.com