
ईव्हिएम भांडाफोड परिवर्तन यात्रा रत्नागिरीत
बहुजन क्रांती मोर्चाने ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रेचे आयोजन देशभरात सुरू केले आहे. ही यात्रा उद्या रत्नागिरीत येणार आहे. या यात्रेचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम करणार आहेत.देशातून ईव्हीएम कायमचे हद्दपार करावे व अन्य मागण्यांसाठी देशभरात ही यात्रा काढण्यात येत आहे. जयेश मंगल पार्क येथे दुपारी दोन वाजता ही यात्रा येणार असून यावेळी राष्ट्रवादीचे कुमार शेटये, बशीर मुर्तूझा, चंद्रकांत परवडी आदी जण उपस्थित राहणार आहे.
www.konkantoday.com