देवरूख येथील १७ वर्षीय तरुणाचा सोमेश्वर येथील तळ्यात बुडून मृत्यू.

देवरूख येथील १७ वर्षीय तरुणाचा रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील एका तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यूझाला. ही घटना आज सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली. आदेश दत्ताराम घडशी (वय १७, रा. देवरुख) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आदेश घडशी हा परीक्षा संपल्यानंतर मिळालेल्या सुट्टीच्या निमित्ताने आपल्या काही मित्रांसोबत रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर येथे फिरण्यासाठी गेला होता.

सोमदेव मंदिराजवळ असलेल्या एका तळ्यात तो पोहण्यासाठी उतरला. अंदाजे १५ ते १६ फूट खोल असलेल्या या तळ्यात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा योग्य अंदाज आला नाही. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आदेश गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या सोबतच्या मित्रांनी तात्काळ आरडा ओरडा करून मदत मागितली.मित्रांचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी धावले. ग्रामस्थांनी कोणतीही वेळ न दवडतातात्काळ मदतकार्य सुरू केले आणि आदेशला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासणी करून आदेशला मृत घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button