नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज युनियनतर्फे धरणे आंदोलन
रत्नागिरी:एएफपीई फेडरेशनप्रणित ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईजच्यावतीने पोस्टमन एटीएम व ग्रामीण डाकसेवक संघटनेने आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात संघटनेच्या सदस्यांनी सक्रिया सहभाग घेतला. या संघटनेच्या २४ मागण्या असून त्यामध्ये कमलेश चंदा समितीच्या सर्व सकारात्मक शिफारसी ग्रामीण डाकसेवकांना लागू करा. सर्व प्रकारच्या रिक्त जागा त्वरित भरा, टपाल खात्यातील खाजगीकरण व कंत्राटीकरण थांबवा, पोस्टल व आरएमएससीलाही पाच दिवसांचा आठवडा लागू करा, खात्याच्या जुन्या इमारतीचे नुतनीकरण करा, ट्रेझरना कॅश ने आण करण्यासाठी सुरक्षा रक्षक द्यावा व टार्गेटची सक्ती थांबवा अशा त्यांच्या मागण्या आहेत. या धरणे कार्यक्रमात विभागीय सचिव सुनिल यादव, अध्यक्ष संतोष गोडबोले, पोस्टमन संघटनेचे सचिव दिपक भितळे, सुरेश गुरव हे सहभागी झाले होते.
www.konkantoday.com