जनशताब्दी एक्स्प्रेसला सावंतवाडी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हावासियांची अनेक दिवसांपासूनची मागणी असलेली जनशताब्दी एक्स्प्रेसला आता प्रायोगिक तत्वावर सावंतवाडी स्टेशनचा थांबा मंजूर करण्यात आला असून ३० ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांकरिता असल्याचे रेल्वेने आपल्या पत्रकात म्हटले आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसला कोकणवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सावंतवाडीसारख्या महत्वाच्या ठिकाणी या एक्स्प्रेसला थांबा नव्हता. त्यामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
हा थांबा मिळावा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर हा थांबा मिळावा म्हणून खा. विनायक राऊत यांनी प्रयत्न केले होते. सध्या हा थांबा सुरू असल्यामुळे सावंतवाडी व परिसरातील प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz