देवरुखची गायिका रसिका गानू ला जिजामाता मालिकेसाठी शिर्षकगीत गाण्याची संधी
स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी देवरुखची गायिका रसिका गानू हिला मिळाली आहे.यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका अमोल कोल्हे यांच्या जगदंबा प्रोडक्शनची आहे.यामध्ये रसिकाला पार्श्वगायनाची संधी मिळाली.या गीताचे कवी मंदार चोळकर असून सत्यजित रानडे यांचे शीर्षक गीत आहे. देवरूखमधील ॲडव्होकेट गिरीश गानू व स्वरदा गानू यांची रसिका ही कन्या आहे.तीने सारेगामा स्पर्धेत पहिल्या पाचात स्थान मिळविले होते.तीने याआधी बंदी शाळा व पोस्टर गर्ल साठी पार्श्वगायन केले आहे.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz