जिल्ह्यात भाजप मजबुतीसाठी प्रयत्न
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षपदी ऍड. दिपक पटवर्धन यांची निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नुकताच आ. प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत राजापुर तालुक्यातील जि.प. सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपाकडे तरूणांना आकर्षित करण्यासाठी आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. प्रसाद लाड हे २५ ऑगस्टपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून संघटना वाढीसाठी बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आदींशी संवाद साधणार आहेत. जिल्ह्यात असलेली भाजपची ताकद अधिक वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
www.konkantoday.com