करबुडे येथे विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

विजेच्या मुख्य वाहिनीला हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाल्याने महिपत तांबे या तरुणाचा मृत्यू झाला.हा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे घडला.करबुडे येथे राहणारे रामचंद्र तांबे हे आपल्या घराची सर्व्हिस लाईन बांबूच्या साह्याने वरती घेत होते त्यावेळी त्यांचा मुलगा महिपत हा येथे आला त्याने लोखंडी पाईपच्या सहाय्याने ही सर्व्हिस वायर वरती घेण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा तोल गेला त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श मुख्य वाहिनीला बसल्याने त्यातून वीजप्रवाह खाली उतरला त्यात महिपत यांचा मृत्यू झाला.
__________________________

कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________

https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button