सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करणार:माजी आमदार प्रमोद जठार
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात होणारा सी वर्ल्ड प्रकल्पासाठी आम्ही जगभरातील गुंतवणुकदार आणि प्रकल्पाची उभारणी करणार्या संस्थांशी चर्चा करीत आहोत. यामुळे या कंपन्या निश्चित झाल्यानंतर सी वर्ल्ड प्रकल्प पुरा करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी आमदार व कोकण पर्यटन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करून दाखवणारच हे त्यांनी स्पष्ट केले. पर्यटनातूनच कोकणचा विकास होणार असून त्यामध्ये आम्ही १५ मेगाप्रोजेक्ट करणार असून देवगड येथे मँगो म्युझियम, देवगड ते पवनचक्की दरम्याने काचेचा पुल, गोपुरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योगा केंद्र, जंगलसफारी असे उपक्रम सिंधुदुर्गात राबविणार असून रत्नागिरी, रायगड, पालघर या तिन्ही जिल्हयात याच धर्तीवर उपक्र्रम राबविणार असून या पाचही जिल्ह्यातील प्रत्येकी १०० गावे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणार आहोत.
www.konkantoday.com