चिपळुणात मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

चिपळूण रेल्वेस्थानकात नागपूर-मडगाव एक्सप्रेसमध्ये मृतदेह सापडल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. अद्यापही या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही. या वयोवृद्धाचे वय जवळपास ६० वर्षे असून उंची ५ फूट ६ इंच आहे. तसेच रंग निमगोरा असून वाढलेली दाढी व केस पूर्णपणे पिकलेले आहेत. चेहरा गोल असून काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली आहे. पायाची व हाताची नखे वाढलेली आहेत. तरी अशा वर्णनाच्या व्यक्तीची माहिती असल्यास चिपळूण पोलीस स्थानकाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरूण जाधव करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button