कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचे सांगत रत्नागिरी जिल्ह्यातील महिला रत्नागिरीहून थेट संतोष देशमुखांच्या घरी गेल्याने खळबळ

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंचत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून यातील सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.त्यामुळे, पोलिसांकडून कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरातकृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे असल्याचे सांगत रत्नागिरी जिल्ह्यातील महिला रत्नागिरीहून थेट संतोष देशमुखांच्या घरी गेल्याने खळबळ उडालीविशेष म्हणजे या महिलेनं कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा खळबळजनक दावा देखील केला होता.

रात्रभर येथील घरासमोर असलेल्या मंडपात त्यांनी आराम केल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट‌ महिलेनं केला. त्यामुळे, काही काळ देशमुख कुटुंबीयांमध्येही शंका आणि गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, पोलीस दाखल झाल्यानंतर महिला बसमध्ये बसून रत्नागिरीला परतली.मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला अचानक पोहोचली. तसेच, या हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली.

सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 6 वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली होती. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला तिने केला. मात्र, पोलिस आल्यानंतर आपलं नाव सांगण्यास देखील नकार दिला. सकाळी, अंघोळीसाठी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं, अशी मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची, असा तिचा हट्ट होता. अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून ती महिला निघून गेली. मात्र, सदरील महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही धनंजय देशमुख यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button