इंदोर येथे झालेल्या ७व्या पश्चिम भारत स्पर्धेत लांज्यातील मोहनिश हिरवे यांचे सुयश
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत BSF रेंज, इंदोर, येथे झालेल्या ७व्या पश्चिम भारत स्पर्धेत ५०मीटर रायफल प्रकारात लांज्यातील मोहनिश हिरवे हे चवथ्या क्रमांकावर.
सुवर्णपदक व रौप्य पदके ही मध्यप्रदेश च्या आकाशराज गोहिल व हर्षवर्धन पटवा आणि कांस्यपदक महाराष्ट्राच्या रोहन अल्हत ह्या नेमबाजानी पटकावले. तर रत्नागिरीतील मानस सुरेंद्र देवळेकर ह्यांना २८वे तर अथर्व निलेश काळे ह्यांनी सुद्धा ३०वे स्थान प्राप्त केले.
डिसेंम्बर २०१९ ला भारतातील सर्वात महत्वाची समजली जाणाऱ्या, दिल्ली येथे होणाऱ्या ६३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मोहनिश हिरवे ह्यांना भाग घेता येणार आहे.
__________________________
कोकणातील ताज्या बातम्या व्हॉट्सअॅपवर वाचण्यासाठी कोकणटुडे व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील व्हा
_________________________
https://chat.whatsapp.com/K0I8GnYg9qHKtqaNeS63Oz