जिल्ह्यात छोटी मुले देखील हृदयविकाराच्या विळख्यात
राष्ट्रीय बाल स्वास्थ सुरक्षा कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये १८विद्यार्थ्यांना हृदय रोग आढळला त्यापैकी बारा जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.जिल्ह्यात ९६हजार ४५६विद्यार्थी आहेत.या तपासणीत विद्यार्थ्यांना हर्निया, अपेंडीस , एनटी ,सारखे ही आजाराचे निदान करण्यात आले. या पैकी १०३विद्यार्थ्यांना शस्रक्रियेची गरज होती यापैकी ९०जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.तेरा जणांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.जिल्ह्यातील लहान मुले देखील आजारांच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र दिसत आहे.